संविधानाचा बचाव झाला तर लोकशाहीचा आपोआपच बचाव होईल – प्रा प्रकाश राठोड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येथील धर्मांध सत्ताधाऱ्यांनी संविधान संपविण्याचा कट रचला आहे.आजच्या स्थितीत येथील लोकशाही धोक्यात आहे,संविधान धोक्यात आहे,मूल्यसंस्कृती धोक्यात आहे,ज्या विचारधारेने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग दिला ती विचारधारा धोक्यात आहे .तेव्हा लोकशाहीचा बचाव करणे गरजेचे आहे.लोकशाहीचे चार स्तंभ आहेत.या चारही स्तंभावर लोकशाही वाचविण्याची जवाबदारी आहे .मात्र मधल्या काळात या चारही स्तंभावर येथील धर्मांध सत्ताधाऱ्यांनी आपला कब्जा केला आहे.तेव्हा अपेक्षा करायची कुणाची तर लोकशाही वाचवणार कोण?असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे.तेव्हा लोकशाही वाचविण्याची मुख्य जवाबदारी आम्हा भारतीय लोकांची आहे.संविधान प्रस्ताविकेत सुरुवातीला लिहिले आहे ‘आम्ही भारताचे लोक’तेव्हा आम्ही प्रथम भारतीय आणि अंतीमही भारतीय आहे ही भावना रुजविणे गरजेचे आहे.तेव्हा हे संविधान वाचवायची मुख्य जवाबदारी जाती, धर्म, पंथ च्या पलीकडे जाऊन गेलेल्या भारतीयांची आहे. आणि संविधानाचा बचाव झाला तर लोकशाहीचा आपोआपच बचाव होईल असे मौलिक प्रतिपादन भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित परिसंवाद कार्यक्रमाचे उदघाटक डॉ प्रा प्रकाश राठोड यांनी व्यक्त केले याप्रसंगी डॉ सर्जनादित्य मनोहर व मुफ्ती अनिक जफी फलाही यांनी समयोचित असे वक्तव्य केले.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी च्या वतीने 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भारतीय संविधान आणि लोकशाही वाचविणे समस्त भारतीयांची जवाबदारी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते .या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक विजय पाटील होते तर उदघाटक प्रमुख वक्ता डॉ प्रा प्रकाश राठोड तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध आंबेडकर वादी साहित्यिक डॉ सर्जनादित्य मनोहर, मुफ्ती अनिक जलाही प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी उपरोक्त नमूद विषयावर मौलिक असे मार्गदर्शन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले.ज्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील कर्मठ कार्यकर्ता राजेश गजभिये, ऍड सचिन चांदोरकर, पत्रकार प्रेमणारायन शर्मा, शोभा वंजारी, मिलिंद कावळे आदींचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन साक्षोधन कडबे गुरुजी ,प्रास्ताविक विद्या भीमटे यांनी केले तर आभार प्रदर्शन समिती चे माजी अध्यक्ष विकास रंगारी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी चे अध्यक्ष विजय पाटील,विद्या भीमटे, सुधा रंगारी,मनोहर गणवीर, कोमल लेंढारे,मनोहर गणवीर, उमाकांत चिमनकर, राजेश गजभिये, विकास रंगारी,दुर्योधन मेश्राम, राजेश ढोके,प्रदीप फुलझेले,बैजनाथ चव्हाण,ऍड सचिन चांदोरकर, मंगेश खांडेकर, सुमित गेडाम यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘महाज्योती’च्या प्रशिक्षण पूर्व परीक्षेत विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

Wed Nov 29 , 2023
– एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, युपीएससी, एमपीएससी, पायलट ट्रेनिंग,  – पीएचडी स्कील डेवलपमेंट परीक्षेचा निकाल जाहीर नागपूर :-बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदि पदांच्या परीक्षेकरिता ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. गरजू आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!