नागपूर :- प्रहार मिलिटरी स्कूल रंगवणार फुटबॉल आणि हँडबॉलचे सामने सीपी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत प्रहार मिलिटरी स्कूल तर्फे येत्या 28 नोव्हेंबर पासून तर 1 डिसेंबर पर्यंत स्वामी विवेकानंद फुटबॉल चॅम्पियशिप (धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेसनगर, नागपूर ) च्या मैदानावर आयोजित केलेली आहे. तसेच 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान स्वामी विवेकानंद हँडबॉल चॅम्पियनशिप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित केलेली आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना खेळाप्रति जागरूक करण्याचा शाळेचा व संस्थेचा उद्देश आहे.