नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शरद पवार विचार मंचच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी सौरभ बंग यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
शरद पवार विचार मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष अमित ढमाळ यांनी एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली. सौरभ बंग हे हिंगणा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रीय युवा कार्यकर्ते आहे. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. आता शरद पवार विचार मंचच्या माध्यमातून सकारात्मक विचार पेरण्याचे कार्य करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.