जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा थाटात समारोप

– विविध स्पर्धेतील 125 पैकी 36 स्पर्धेक विजयी

नागपूर :- पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या करण्यात आले. यावेळी 15 ते 29 वयोगटातील 125 स्पर्धकांनी विविध स्पर्धेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये 36 स्पर्धेकांनी विजय मिळविला. समारोपीय कार्यक्रमात विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी विजयी स्पर्धेकांना बक्षिस देवून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

युवा महोत्सवात पोस्टर स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, रांगोळी, कथा लेखन, लोकनृत्य, लोकगित (एकल व दुहेरी) महाराष्ट्र राज्यासाठी असलेल्या वक्तृत्व स्पर्धेत तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रोडक्ट आदी स्पर्धा घेण्यात आल्या.

महोत्सवाच्या यशस्वीतेकरीता नटराज आर्ट अँड कल्चरल सेंटरचे प्राचार्य रविंद्र हरिदास यांचे सहकार्य लाभले. या महोत्सवास जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी माया दुबळे, राजेंद्र साप्ते, तज्ज्ञ परिक्षक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बार्टीमार्फत संविधान दिवसानिमित्त संविधान रॅली 

Sat Nov 25 , 2023
– सवलतीच्या दरात पुस्तक विक्री नागपूर :- भारतीय संविधान दिन अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी सकाळी 8 वाजता समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रादेशिक कार्यालय नागपूर सह समाजिक न्याय भवन विभागाच्या अधिनस्त असणारे महामंडळ, दीव्यांग शाळेचे विद्यार्थी, शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी, सफाई कर्मचारी शाळेतील विद्यार्थी, समाजकार्य महाविद्यालयतील विद्यार्थी व कर्मचारी यांच्या सहभागाने संविधान रॅलीचे आयोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com