नूतन रेवतकर यांची महाराष्ट्र प्रदेश “संघटन सचिव” या पदावर नियुक्ती 

नागपूर :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व महिला अध्यक्षा तसेच सध्याच्या नागपूर शहर मुख्य प्रवक्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असलेल्या नूतन रेवतकर यांना करत असलेल्या कामांची उत्तम भेट म्हणून पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेश ‘संघटन सचिव या पदावर पदोन्नती देण्यात आली. नूतन रेवतकर यांची ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. नूतन रेवतकर यांची नियुक्ती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रयत्नाने झाली असून अनिल देशमुख त्यांच्याच हस्ते नूतन रेवतकर यांना हे नियुक्ती पत्र सुपूर्द करण्यात आले.आपण करत असलेल्या कार्याची पक्षाने दखल घेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिल्याबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार खा. सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख , नागपूर शहर अध्यक्ष दूनेश्र्वर पेठे, युवानेते सलील दादा देशमुख तसेच पक्षातील सर्वांचे मनःपूर्वक आभार नूतन रेवतकर यांनी या निमित्ताने मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नमाद महाविधालयात पोलीस स्मृती दिवसानिमित्त वीर मातेचा सन्मान

Tue Oct 24 , 2023
गोंदिया :- गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने पोलीस स्मृती दिनानिमित्त नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या मातेचा, वीर मातेचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात पोलीस स्मृती दिनानिमित्त ८ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!