जपानच्या उपासकांनी घेतली श्रामणेरची दीक्षा

– धम्मदीक्षा सोहळ्यात हजारो बांधवांनी घेतली धम्मदीक्षा

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे आयोजित धम्मदीक्षा सोहळ्यात जपानहून आलेल्या उपासक उपासिकांनी श्रामणेरची दीक्षा घेतली. सोमवारी सकाळी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते 14 अनुयायांना दीक्षा देण्यात आली.

दीक्षाभूमीच्या प्रांगणात जपानचे उपासक उपासिका डोक्यावरचे कोस काढून उपस्थित झाले. श्रामणेरची दीक्षा घेण्यासाठी सर्व उपासक रांगेनी होते. त्यांच्या पाठीमागे जपानचे प्रतिनिधी बसले होते. उपासकांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतल्यानंतर भदंत ससाईंचे आशीर्वाद घेतले. अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर ससाई यांच्याकडून त्रिशरणसह दशशील ग्रहण केले. सोबतच आयुष्यभर तथागत गौतम बुध्दांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला.

श्रामणेर दीक्षा घेणार्‍यात महिला आणि पुरूषांचा समावेश होता. यात नागा बिकूनी, नागा पुरू, नागा दावई, नागा किर्रा, नागा सेवक, नागा चंद्रा, नागा सदक, नागा सॅम्युनेल, नागा बादल, नागा पवित्रा, नागा बालिश, नागा उत्कुलश, नागा इसामू, नागा चामकादल यांचा समावेश होता.

मंचावर भदंत ससाई यांच्यासह भदंत धम्मसारथी, नागवंश, प्रज्ञा बोधी, भीमा बोधी, नागसेन, महानामा, राहुल, धम्मविजय, कश्यप, भदंत धम्मप्रकाश, संघप्रिया, विशाखा गौतमी, पुंडलिक उपस्थित होते. धम्म दीक्षेच्या दुसर्‍या दिवशी 15 हजाराच्या वर अनुयायांनी धम्मदीक्षा घेतली. त्यासर्वांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी जपान, थायलंड, मलेशिया आणि देश विदेशातील बौध्द भिक्खु उपस्थित होते. धम्मदीक्षा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिक्खु संघ, धम्मसेनेचे पदाधिकारी रवि मेंढे, नन्ना सवाईथूल आणि सदस्य सहकार्य करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र धनुर्विद्या खेळाची भूमी बनवू या - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खेळाडूंना ग्वाही

Tue Oct 24 , 2023
–  उपमुख्यमंत्र्यांनी ओजस देवतळे, तुषार शेवाळे, आदिती स्वामी या तिरंदाजांची घेतली भेट नागपूर :- महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात सातत्य दाखविले असून याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. महाराष्ट्रात या क्रीडा प्रकारासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याचा शासन कटीबद्ध आहे. राज्याला धनुर्विद्या खेळाची भूमी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!