नागपूर :- साधना गेडाम मु.नागपूर यांनी पत्रपरिषदेमध्ये पत्रकारांना सांगितले की कर्मण्य कोचिंग इन्स्टिट्यूट बुटीबोरी एमआयडीसी रोड नागपूर यांनी चार विद्यार्थ्यांची फसवणूक केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आणून फीस परत न देण्याचा त्यांच्या भूमिकेमुळे पत्रकारांना साधना गेडाम व मनोहर कोरपे यांनी सांगितले. पत्रकारांना कर्मण्य कोचिंग इन्शुटियुट बद्दल ही माहिती दिली.
त्या माहितीमध्ये चार विद्यार्थ्यांचे भविष्य खराब झाल्याचे दिसून आल्याने त्यांनी नागपूरला परिषदेमध्ये धाव घेतली. त्यामध्ये नोएल गेडाम, अनमोल कोरपे, श्रेयस भजने आणि युगल पटले हे चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या चारही मुलांकडून एक लाखाच्या वर फी घेतली परंतु तेथे कुठलीही व्यवस्था न होता, नियमित क्लास न होणे, फॅकल्टी नसणे, त्या समस्ये मुळे मुले कंटाळली. शेवटी सगळ्या विद्यार्थ्यांनी तेथून ऍडमिशन काढली. म्हणून यांनी फि वापस करण्यास इंकार केला. त्यांनी असे सुद्धा सांगितले की, तुम्ही जे काय होईल ते करून घ्या ! तुम्ही कोर्टात जाऊ शकता ! हे सुद्धा भाषा त्यांनी वापरली परंतु घेतलेले पैसे आम्ही परत करणार नाही. त्यांच्या विरोधात बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली परंतु काहीही न्याय मिळाला नाही. ग्रामीण एसपी मुख्यालय नागपूर येथे या विषयासंदर्भात तक्रार केली होती परंतु त्यांनी ही दखल घेतली नाही.तर आम्ही कुठे न्याय मागचा आम्हाला कोण न्याय देणार या अपेक्षेने पत्रपरिषद मध्ये पत्रकारांना माहीती सांगितली.
पैसा परत मिळण्यात यावा. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याकरिता पत्रकार परिषदेमध्ये धाव घेतली.