नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क ०५ चे अधिकारी अमलदार हे पोलीस ठाणे पारडी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेले खात्रीशीर माहीतीवरून शिमव नगर, निजाम भांगारवालेचे गोडाउन समोरील रोडवर त्यांना अॅक्टीव्हा वरील दोन इसम हे संशयीतरित्या वाहन चालवितांना दिसुन आल्याने त्यांनी सदरचे वाहन थांबवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यानी आरोपी १) आशिष सुरेश नंदनवार वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. ३८४, नागेश्वर नगर पारडी नागपूर २) अमीत रामदास चौरे वय ४० वर्षे, रा. शिवम नगर झोपडपट्टी, पारडी, नागपुर असे सांगीतले त्यांची पंचासमय झडती घेतली असता, त्यांच्या जवळ एका प्लास्टीक पिशवीमध्ये ४ किलो ४०० ग्रॅम गांजा मिळून आला. आरोपी जवळुन गांजा, अॅक्टीव्हा गाडी, दोन मोबाईल फोन असा एकुण २,१६,०००/- रूचा मुद्देमाल जप्त करून आरोपीचे हे कृत्य कलम ८(क), २०(ब), २(ख), २९ ए.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये होत असल्याने आरोपांना मुद्देमालासह कारवाईस्तव पोलीस ठाणे पारडी यांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त सा. गुन्हेशाखा सहा. पोलीस आयुक्त सा गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. कल्याणकर, पोउपनि, राहुल रोटे, सफौ राजेश लोही पोहवा. महादेव थोटे, भिमराव वाल, रामचंद्र कारेमोरे, रामनरेश यादव, गौतम रंगारी, पोनाअं राजेन्द्र टाकळीकर, अमोल भकते यांनी केली.