नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महावितरण आणि महानिर्मितीच्या काटोल रोड येथील विद्युत भवन कार्यालयात या महान विभुतींना अभिवादन करण्यात आले.
तत्पुर्वी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते विद्युत भवन येथील प्रांगणात धवजारोहण करण्यात आले, तद्पश्चात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दोडके, महानिर्मितीचे उपमुख्य अभियंता विजय बारंगे, महावितरणचे अधीक्षक अभियंता हरिश गजबे, अमित परांजपे, राजेश नाईक, अजय खोब्रागडे, महानिर्मितीचे अधीक्षक अभियंता के. एस सुर्यवंशी, महावितरणचे प्रभारी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रदिप सातपुते, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, समिर शेंद्रे यांच्यासह महावितरण आणि महानिर्मितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.