नागपूर :- गणेशोत्सव २०२३ निमीत्ताने दिनांक २८.०९.२०२३ रोजी होणारे गणेश विसर्जन व ईद ए मिलाद या सणामध्ये निघणाऱ्या मिरवणुकी दरम्यान नागपूर शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या करीता नागपूर शहर पोलीसांचे वतीने दिनांक २३.०९.२०२३ रोजी १६.३० वा. चे सुमारास पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे प्रमुख उपस्थितीत पोलीस ठाणे तहसिल हद्दीतील सेवासदन चौक येथून पथसंचलनाला सुरूवात करण्यात आली. पथसंचालनाचा मार्ग सि.ए. रोड, सेवासदन चौक, दोसर भवन चौक, मोहम्मद अलीरोड, मोमीनपुरा टिमकी चौक, गोळीबार चौक, गांजाखेत चौक, तिनमल चौक, शोट चौक, सतरंजीपूरा चौक, सुनिल हॉटेल चौक, क्वेटा कॉलोनी चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक, आदमशहा चौक, गांधी पुतळा चौक ते सि.ए. रोड ने येवुन फवारा चौक येथे समाप्त करण्यात आले.
पथसंचलनाचे मार्गात येणारे गणेश मंडव्याचे पदाधीकारी यांनी पथसंचलनाचे स्वागत केले. मा. पोलीस आयुक्त यांनी गणेश पेंडालला भेटी दिल्या व उपस्थितांना शुभेच्छा देवून त्यांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या. पथसंचलनामध्ये नागपूर शहर पोलीस दलातील सर्व अपर पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उप आयुक्त तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, संपुर्ण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, सर्व शाखेचे पोलीस निरीक्षक, जलद प्रतिसाद पथक, आर.सि.पी पथक, सर्व पोलीस ठाणेचे तपास पथक, व खुपिया पथक, विशेष शाखा पथक, गुन्हे शाखेचे पथक व राज्य राखीव पोलीस दलाचे पथकातील अधिकारी व अंमलदार असे एकुण १००० अधिकारी व अंमलदार यांचा सहभाग होता.