नागपूर :- आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात आज साजरी करण्यात आली. उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त दिपाली मोतीयेळे, सहायक संचालक शंकर बळी, तहसिलदार राजेश भांडारकर, नायब तहसिलदार आर.के. डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.