नागपूर :- राज्यपाल रमेश बैस उद्यापासून तीन दिवस दिनांक 2 ते 4 सप्टेबर 2023 पर्यंत नागपूर दौऱ्यावर आहेत.
राज्यपालांचे 2 सप्टेंबर रोजी रात्री नागपूर येथे आगमन होणार असून ते राजभवन येथे मुक्कामी राहतील. 3 सप्टेबर रोजी वर्धा येथे महाकाली शिक्षण संस्थेचा कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. दिनांक 4 सप्टेंबर रोजी नागपूर विद्यापीठात शिक्षण दिनाच्या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यानंतर ते मुंबईकडे प्रयाण करतील.