राज्यपालांच्या उपस्थितीत व्हिला टेरेसा शाळेचा वार्षिक दिन व पुरस्कार सोहळा संपन्न

– शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा, राष्ट्रभाषा शिकण्यास प्रेरित करावे: राज्यपालांची सूचना

मुंबई :- नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणाला महत्व देण्यात आले असल्याचे नमूद करून पालक तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा व राष्ट्रीय भाषा शिकण्यास प्रेरित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

मुंबईतील व्हिला टेरेसा हायस्कूलचा वार्षिक दिवस तसेच पुरस्कार वितरण समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. १८) शाळेच्या सभागृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

विद्यार्थ्यांनी इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन आदी जागतिक भाषा अवश्य शिकाव्यात परंतु त्यांना मातृभाषा तसेच राष्ट्रभाषेत बोलण्यास देखील सक्रिय प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या स्थापनेच्या ९१ व्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल विला टेरेसा हाईस्कूलचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मुलींच्या शिक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या कार्यात योगदान दिल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले. 

शाळा व महाविद्यालयांमध्ये उल्लेखनीय परिवर्तन घडत असून आजवळ जवळ ९० टक्के शिक्षक महिला आहेत. विद्यापीठांमध्ये ४० पैकी ३५ सुवर्ण पदके विद्यार्थिनी मिळवत आहेत. आगामी काळात नर्सिंग क्षेत्राप्रमाणे अध्यापन कार्यात महिला शिक्षकांचे प्रमाण १०० टक्के होईल. महिलांनी आता केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अध्यापनाचे कार्य स्वीकारून भारताला विश्वगुरू होण्यास मदत करावी असे राज्यपालांनी सांगितले.

कृत्रिम प्रज्ञेच्या आजच्या काळात केवळ साक्षर होणे पुरेसे नसून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे व तोटे सांगून या क्षेत्रात देशाला आघाडीवर ठेवण्यासाठी मदत करावी, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरण रक्षण देशापुढील आव्हान असून युवा पिढीने पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा तसेच प्लास्टिकचा उपयोग कमी करून अधिक झाडे लावावी असे त्यांनी सांगितले.

छंदांचे महत्व विशद करताना विद्यार्थ्यांनी चित्रकला, संगीत, खेळ यापैकी कुठलाही छंद जोपासावा कारण त्यामुळे इतर विषयांचे चांगले होते व तणाव मुक्त होण्यास मदत मिळते असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुसी शाह, सेंट टेरेसा हायस्कूलच्या प्राचार्या बबिता अब्राहम, संजीता कुजूर, प्रशासन अधिक्षिका लिमा रोज तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आझाद हिंद सेनेचे सरसेनापती, थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

Sat Aug 19 , 2023
नागपूर :- आझाद हिंद सेनेचे सरसेनापती, थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक महेश धामेचा, माहिती व जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, सहायक अधीक्षक  राजकुमार मेश्राम, कैलाश लांडे, अमोल तपासे, विनोद डोंगरे, शैलेष जांभुळकर आदी उपस्थित होते.     Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!