दुचाकीची चारचाकी वाहनास धडक, दोघे जख्मी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील कन्हान नदी पुला सामोर विरूध्द दिशेने दुचाकी चालकाने आपले वाहन निष्काळजीने चालवुन सामोरून अचानक चारचाकी वाहनास धडक मारून खाली पडुन दुचाकी चालक व मागे स्वार महिला जख्मी झाल्याने कन्हान पोलीस स्टेशनला दुचाकी चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनितकुमार अमिरदास सोनवानी वय २६ वर्ष रा. झुजर तह. घुगरी जि. मंडला (म.प्र) हे फोर्स कंपनी ची चारचाकी वाहन क्र एम पी २० बी ए ७८५० ने मित्र श्यामलाल यादव सोबत सकवा गावावरून सोमवार (दि.१४) ला दुपारी ३ वाजता निघुन दुस-या दिवसी (दि. १५) ऑगस्ट ला सकाळी ८ वाजता जाम नागपुरला पोहचुन तेथुन सामान, मजुर घेऊन निघाले असता दुपारी ३ वाजता नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गा वरील कन्हान नदी पुलासामोर विरूध्द दिशेने येणा-या हिरो होंडा स्पेंडर दुचाकी क्र एम एच ४० आर ६५९५ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवुन विरूध्द दिशेने अचानक ये़ऊन सामोरून चारचाकी वाहनास धडक मारून दुचाकीसह खाली पडुन दुचाकी चालक व मागे स्वार महिला जख्मी झाल्याने त्याना कन्हान च्या दवाखान्यात नेले असता डॉक्टरानी कामठीला पाठविल्याने दोघाना ही कामठीच्या खाज गी दवाखान्यात नेऊन भर्ती केले. कामठी पोलीसानी पोलीस स्टेशन नेऊन कन्हान पोस्टे पाठवुन फिर्यादी चारचाकी चालक सुनितकुमार सोनवानी यांचे तक्रारी वरून कन्हान पोलीसानी स्पेंडर दुचाकी चालक अप घातास कारणीभुत असल्याने त्यांचे विरूध्द कलम २७९, ३३७, ३३८ भादंवि मोवाका १७७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेत पक्षप्रवेश

Fri Aug 18 , 2023
रामटेक :- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या वतीने नुकताच दिनांक १७ ऑगस्ट ला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात जिल्हाध्यक्ष शेखर दुन्डे यांच्यावर विश्वास ठेवत रामटेक विधानसभा क्षेत्रातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्मान वाहतुक सेनेत प्रवेश केला. यावेळी प्रामुख्याने रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष शेखर दुन्डे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष खेमेंद्र (गुड्डू) पारधी व वरिष्ठ पदाधिकारी किरण जाधव यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!