संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– तिरंगामय ड्रैगन पैलेस बघणा-याकरिता लोकांची तुफान गर्दी
कामठी :- नागपूर जिल्हयातील कामठी येथील जगप्रसिध्द ड्रैगन पैलेस टेम्पल तिरंगाच्या झगमगात संपूर्ण तिरंगामय झाले होते. ड्रैगन पैलेस च्या आकर्षीत रोषणाईला बघण्याकरिता व सतत सुट्टया असल्यामुळे भेट देणा-या लोकांची तुफान गर्दी झाली होती.
ड्रैगन पैलेस परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्य मंत्री अँड. सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते ध्वजारेहण करण्यात आले. या प्रसंगी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या स्वातंत्र्य विरांप्रति कृतज्ञता व्यक्त करत असतांना प्रत्येक नागरिकांनी देशाप्रति आपले कर्तव्य बजावले पाहीजे असे आव्हान अँड. सुलेखा कुंभारे यांनी उपस्थितांना केले.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, ओगावा सोसायटी, ड्रैगन पैलेस टेम्पल, हरदास एज्यकेशन अँड कल्चरल सोसायटी, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र ड्रैगन इंटरनैशनल स्कूल, हरदास हायस्कूल, बहूजन रिपब्लिकन एकता मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरन परिसर समिती, ईत्यादी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकगण व कर्मचा-यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.