संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी येथील शैक्षणिक परिसरात देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, संस्थेचे सचिव सुरेश भोयर, तसेच संस्थेद्वारा संचालित फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, कामठी तंत्रनिकेतन चे प्राचार्य मुकेश घोळसे, उन्मेष पोकळे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप कोहळे, अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रुपाली पाटील, पब्लिक स्कूलच्या प्राचार्या ईशा मुदलीयार, संस्थेचे सर्व प्राध्यापक गण, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.