नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.08) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अबिंका स्विट मार्ट, गोकुलपेठ मार्केट, नागपूर यांच्यावर रेस्टॉरंटचा कचरा चेंबरमध्ये टाकला जातो आणि कचरा शुल्क भरले जात नसल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच डॉ. रश्मी जिरापूरे, विर चक्र कॉलोनी, कोटोल रोड, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येक 5 हजार दंड वसूल करण्यात आला.गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्याम किराणा शॉप, गांधीबाग, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. दिवाकर किराणा शॉप, मस्कासाथ इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जुनेजा बिल्डर्स, सी. आय.डी. ऑफिस चौक, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच त्यांच्यावर बांधकाम साहित्य टाकून जवळच्या फूटपाथचे नुकसान केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मे. रेन्बो हेयर्ट प्रे स्कुल, पोलीस लाईन टाकळी, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येक 5 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.