नागपूर :- नांदेड येथील पोचिराम कांबळे, गौतम वाघमारे , जनार्दन मोवाडे यांच्या शहादत ने पावनखिंड झालेल्या नांदेड नगरीत आंबेडकरी विचार मोर्चा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांचे आगमन झाले. याप्रसंगी हुजूर साहेब रेल्वे स्टेशन नांदेड समोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बागडे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यानंतर सहयोग नगर येथील माता रमाई सभागृहात पदग्रहण समारंभ संपन्न झाला.
आंबेडकरी विचार मोर्चा आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा नांदेड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष पदावर नामदेव गच्चे यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी त्यांचा सत्कार बागडेनी केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धर्मा बौद्ध बागडे, प्रकाश कांबळे, सागर पाटील, शिवाजी गच्चे, सोनू दरेकर, लोकमत चे उपसंपादक अविनाश पाईकराव यांचे याप्रसंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन साहेबराव यांनी तर आभार राहूल कोकरे यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.