यवतमाळ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ शहर अध्यक्ष पदी लाला राऊत यांची निवड करण्यात आली . रविवार पुसद येथे अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटखरे यांच्या मान्यतेने आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. लाला राऊत यांनी यापूर्वी विदर्भ अन्याय निवारण समिती चे अध्यक्ष फुटपाथ संघटनेचे सल्लागार अश्या विविध सामाजिक संघटनने च्या पदावर त्यांनी काम केले आहे. यवतमाळ शहर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला लाला राऊत यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत आणि बळकट होईल असा विश्वास आमदार इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांचा विचारानुसार पुढील काळात पक्ष संघटना साठी भरीव काम करून सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करण्याची इच्छा लाला राऊत यांनी व्यक्त केली आहे यावेळी प्रामुख्याने मोहिनी इंद्रनील नाईक, बाळासाहेब कामारकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, तारीकभाई लोखंडवाला, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,क्रांती राऊत धोटे,नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, योगेश धानोरकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, उत्तम गुल्हाने जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, करण ढेकळे प्रदेश सरचिटणीस युवक राष्ट्रवादी काँग्रेस, राजेंद्र धोंगडे आकाश चंदनखेडे,नयन लुंगे अमीर काझी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ शहराध्यक्ष पदी लाला राऊत याची निवड
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com