नागपूर :- दिनांक २०,०७,२०२३ च्या १५.३० वा. चे सुमारास फिर्यादी खुशी सरोजकुमार मेश्राम वय १९ वर्ष रा. नं. २५७ सुगतनगर पोलीस चौकी मागे नागपुर या त्यांचे मित्रासह त्यांच्या दुचाकी गाडीने नारा गावाकडे गाडी देण्यासाठी जात असतांना नाराघाटचे रोडवर फिर्यादीची मैत्रीण शिल्पा २० वर्ष रा. गट्टीखदान नागपूर व तिचे सोबत तिचा मित्र सुयोग परसराम उके वय २३ वर्ष रा. इंदोरा, जेतवन बौध्दविहारा जवळ, नागपूर हे दुचाकीने जात असतांना फिर्यादींला दिसले तेव्हा त्यांनी दोघांचेही वाहने थांबवून रोडने बाजुला बोलत उभे असतांना आरोपी मंगल सुरजितसिंग गुलेरीया वय २० वर्ष मानव नगर, टेकनाका, पंचभाई यांचे घरी किरायाने, कपिलनगर हा मागुन ॲक्टिवा गाडीने येवुन फिर्यादी जवळ गाडी थांबवुन फिर्यादीचे मित्रास तुला गाडी चालवता येत नाही का असे म्हणुन अश्लिल शिवीगाळ केली. व फिर्यादीचा मित्र रौनक याला हातबुक्कीने मारपिट करू लागला फिर्यादीचा मित्र सुयोग उके हा भांडण सोडविण्यास गेला असता त्याला सुध्दा शिवीगाळ करून धक्का देवुन आरोपीने कमरेतून चाकू काढून सुयोग यास जिवानिशी ठार मारण्याचे उद्देश्याने त्याचे पोटावर चाकु मारू लागला सुयोगने त्याचा हात पकडला असता त्याने पुन्हा चाकु मारण्यास सुरूवात केली. या मध्ये सुयोग उके याचे पोटावर गंभीर दुखापत झाली. जख्मी यास उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे दाखल केले असुन उपचार सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे जरीपटका येथे पोउपनि बाव्यसाहेब टेकाळे यांनी आरोपीविरुद्ध कलम ३०७, २९४, ५०६ (२) भादवि अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.