अरोली : पो.स्टे. अरोली हद्दित फिर्यादीची मुलगी वय १७ वर्षे १० महिने ही घरी हजर असता फिर्यादी ही किराणा सामान आणणे कामी आदासा गावामध्ये गेली होती. तेव्हा मुलगी ही मोठया मुलासोबत घरीच हजर होती. फिर्यादी ही घरी सामान घेवुन परत आली असता मुलगी ही घरी दिसली नाही. फिर्यादी हिने मुलाला मुली विषयी विचारले असता त्याने माहीत नसल्याचे सांगीतले. यावरून फिर्यादीने मुलीचा गावात नातेवाइकाकडे व इतरत्र शोध घेतला असता मिळून आली नाही. फिर्यादीच्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञानाचा फायदा घेवुन फुस लावुन पळवून नेले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. अरोली येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार टिकाराम जाधव व नं. १३३१ हे करीत आहे.