जिवानीशी ठार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

नरखेड :- अंतर्गत आठवडी बाजार मोवाड येथील नगर परीषद कॉम्प्लेक्स समोरील रोडवर दिनांक १७/०७/२०२३ चे रात्री १०.३० वा. ते दिनांक १८/०७/२०२३ चे सकाळी ०७.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून आठवडी बाजार मोवाड येथील नगर परीषद कॉम्प्लेक्स समोरील रोडवर मृतक नामे- मुन्नी उर्फ मंजुशा रामदास आमटे वय ५० वर्ष, रा. मोवाड हिला जिवानीशी ठार मारून रोडचे बाजूला असलेल्या सिमेंट नालीचे मधुन आत मध्ये टाकले. सदर प्रकरणी फिर्यादी नामे दिलीप किसना बनाईत, वय ३५ वर्ष, रा. वार्ड नं. १४ मोवाड यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. नरखेड येथे आरोपीविरुध्द कलम ३०२, २०१ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन नरखेड येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक क्रिष्णा तिवारी हे करीत आहे..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Wed Jul 19 , 2023
पो.स्टे. बोरी :-  पो.स्टे.बोरी हद्दीत फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय १७ वर्ष ११ महिने ही दिनांक १६/०७/२०२३ चे सायंकाळी ०६.०० वा. घरी कुणालाही न सांगता घरून निघून गेली. ती आजपावेतो घरी परत आली नाही. तिचा आजुबाजुला व मित्र मैत्रिणीकडे शोध घेतला मिळून आली नाही. मुलीचे गावातील संशयीत आरोपी नामे- अमीत धुर्वे रा. आजनगाव हिंगणा बोरी याचेसोबत प्रेमसंबंध आहे असे समजले अमीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!