नागपूर :- एकात्मिक रस्ते विकास योजने अंतर्गत नव्याने टाकण्यात आलेल्या 11 केव्ही वाहिनीची जोडणी आणि जुन्या उपरी उच्चदाब वाहिनीला काढण्याच्या महत्वाच्या आणि तातडीच्या कामासाठी बुधवार दि. 21 जुलै 2023 रोजी सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत महावितरणच्या महाल विभागातील काही भागांमध्ये वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याने या काळात परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहिल, अशी माहिती महावितरणतर्फ़े देण्यात आली आहे.
एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणामुळे हटविण्यात आलेली उपरी उच्चदाब वाहिनी काढणे आणि सोबत नव्याने टाकण्यात आलेल्या केबल्स ज्वाईंटच्या कामासाठी हा वीजपुरवठा बंद करण्यात येणार असल्याने बुधवार दि. 19 जुलै 2023 रोजी सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत 11 केव्ही न्यु इंग्लिश उच्चदाब वाहिनीवरील नास्तिक चौक, चिटणीस पार्क, न्यु इंग्लिश, टाटा पारसी कॉलनी, देवडीया भवन, गांधी सागर, जलालपुरा, दक्षिणामुर्ती ओळी, सेंट्रल एव्हेन्यु रोड, बुधखान मिनार, आदर्श शाळा, प्लायवुड ओळी आणी शारदा चौक या भागातील वीज पुरवठा बंद राहील, ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा सोबतच या मार्गावरील वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी महावितरणतर्फ़े हे काम करण्यात येणार असून, ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.