मौदा :- अंतर्गत १७ किमी अंतरावर दहेगाव येथे दिनांक ०१/०४/२०२३ ते २३/०५/२०२३ ००.०० वा. दरम्यान फिर्यादी रूपाली अमोल आंबीलडूके, वय २३ वर्ष रा. दहेगाव व आरोपी १) अमोल पूरनलाल आंबीलडूके हे पती पत्नी असून दिनांक १०/०३/२०२३ रोजी रितीरिवाजाने लग्न झाले असून लग्ना पासून पती १५ दिवस चांगले राहीले नंतर तू नातेवाईका सोबत बोलायचे नाही असे म्हणून शुल्लक कारणावरुन वादविवाद करीत होते. दिनांक १७/०५/२०२३ रोजी तूला फोनची काय गरज आहे असे म्हणून हातातून फोन घेवून आरोपींनी फिर्यादीच्या वडीलांना रागाने तुम्ही २४ तारखेला घरी या नाही तर २५ तारखेला तूमची मुलगी असे म्हणून फोन बंद केले दिनांक २३/०५/२०२३ रोजी फिर्यादी यांचे वडील घरी आले पतीच्या कुटुंबातील लोक व फिर्यादी यांचे नातेवाईक असे मिळून मिटींग घेण्यात आली आरोपी पती व सासू २) कुंदा आंबीलडूके दोन्ही रा. दहेगाव यांनी फिर्यादी सोबत लग्न झाल्या पासून शुल्लक कारणावरुन वादविवाद करुन शारिरिक व मानसिक त्रास दिला. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ४९८ अ ३४ भादवी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार गौतम मेश्राम करीत आहे.
शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com