– पुस्तकांचे केले वितरण
रामटेक :- तालुक्याच्या सिमारेषेवर असलेल्या तथा ग्रामपंचायत काचुरवाही अंतर्गत येत असलेल्या खोडगाव येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये शाळेच्या पहील्या दिवसीच उपसरपंच शिशुपाल अतकरे यांनी विद्यर्थ्यांना पुष्प देत त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
खोडगाव जि.प. शाळेमध्ये १ ते ४ वर्ग आहे. येथे गावातील व परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान नवीन सत्राची सुरुवात होताच म्हणजेच दि. ३० जुन रोज शुक्रवार ला पहिल्या वर्गात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांची मोठी पटसंख्या पाहुन उपसरपंच शिशुपाल अतकरे यांनी पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. यामुळे विद्यार्थ्यांचाही शाळेप्रती उत्साह वाढला. तसेच वर्ग १ते ४ पर्यतच्या सर्व मुलांना जिल्हा परिषद शाळेतर्फे पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये शिशुपाल अतकरे उपसरपंच ग्रा.पं. काचुरवाही (खोडगाव) यांचेसह कोडवती , वरठी , पितांबर पानतावणे, भारत गायकवाड, लक्ष्मी गायकवाड, लता बोबडे आदी उपस्थित होते.