मोदी सरकारचे निर्णय घरोघरी पोहचवा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-शिव नगरात भाजपचे बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ अभियान

कामठी :- केंद्रातील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्ती निमित्त राबविण्यात येत असलेल्या विशेष जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचे ऐतिहासिक निर्णय सामान्यापर्यंत पोहचवा असे आवाहन भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी केले दि. २० जून ते ३० जून या कालावधीत देशातील प्रत्येक लोकसभा व विधानसभा मतदार संघात बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कामठी विधान सभा मतदार संघात माजी मंत्री भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामठी शहरातील प्रभाग 15 येथे बूथस्तरीय ‘घर-घर संपर्क’ अभियान गुरुवार दि. 29 जुन रोजी करण्यात आले .

कामठी शहरातील प्रभाग क्र.15 तील बुथ क्र 80 आणि 81 मधील दिगलाल महानंद, जागेश्वर गोंडाने, गुंडेराव लेंडे, सतीश यादव, विनायक वक्कलकर, रविंद्र सोनवाने, विरेंद्र राऊत, प्रबुद्ध वासनिक, मनोहर गजभिये, रिंगमल टांडी, जगदीश द्विवेदी, प्रतिमा सहारे, विमला बोपचे, आशा वाघाडे, गोपाल सोनानी, राजेश पाटील यांना उज्वल रायबोले यांच्या हस्ते माहिती पत्रक देऊन करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा पदाधिकारी विक्की बोंबले, सुनिल वक्कलकर यांच्यासह बुथ प्रमुख शंकर चवरे,विकास कठाने, अरविंद चवडे, दिनेश खेडकर आणि व इतर नागरिक उपस्थित होते. परिसरातील घरी सदिच्छा भेटी देऊन गेल्या ९ वर्षातील मोदी सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळावा 

Mon Jul 3 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – उद्या शाहीर मेळावा गुरुपुजेला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री,चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार कामठी :- भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया भारतीय क.शाहीर ड.मंडळ, कामठी ( अंतर्गत ) भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार शाहीर कलाकार मेळावा आणि गुरुपूजा श्रीराम जानकी मंगल कार्यालय, राम मंदिर, मच्छीपूल, कामठी जि. नागपूर दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिनांक ४ जुलै २०२३ मंगळवार रोजी वेळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!