संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- इतवारी कामठी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सावला रेल्वे स्टेशन रेल्वे की मी नंबर 1106/26-28 अनंतराव एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने अनोळखी इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री 2 वाजता घडली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही.मृतकाची उंची 5 फूट पाच इंच,रंग गोरा, केस काळ्या रंगाचे, अंगावर हिरव्या रंगाचे हाफ शर्ट, काळ्या रंगाचे लोअर,उजव्या हाताच्या पंजावर दिल हे चिन्ह व त्यामध्ये c असे कोरलेले आहे.तेव्हा असे वर्णनाचे व्यक्ती ओळखीचे वाटल्यास तपासी अंमलदार अजय चरडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.