संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी बस स्थानक मधील प्रवासाच्या प्रवासी सुविधेसाठी लाखो रुपयांच्या निधीतून सुसज्ज व आधुनिक पद्धतीचे शौचालय उभारण्यात आले आहे.या शौचालयाचा कारभार हा परिवहन महामंडळ च्या वतीने 11 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने देण्यात आला.हे कंत्राट होऊन आज दीड महिना लोटत आहे मात्र या कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे येथील सुसज्ज शौचालयाचा शुभारंभ करण्यात आला नसल्याने प्रवसीना असुविधेचा सामना करावा लागत आहे.
कामठी बस स्थानक परिसरात एक जुने प्रसाधन गृह आहे. एका कडेला पुरुष तर दुसऱ्या कडेला महिला प्रसाधन गृहाची सोय करण्यात आली आहे.मात्र हे प्रसाधन गृह प्रवासी सोयीच्या माध्यमातुन अपुरे पडत आहे तर महिला प्रसाधन गृहाच्या काही असुविधेमुळे काही समाजकंटक या महिला प्रसाधन गृहाच्या कडेला लपून राहून महिलांना लघुशंका करताना पाहत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे.शुभरंभाच्या प्रतीक्षेत असलेले सुसज्ज हे सुलभ शौचालयाचा लवकरात लवकर शुभारंभ झाल्यास प्रवासीना सोयीचे होईल व होणाऱ्या अनुचित घटनेला आळा बसेल.हे सुलभ शौचालय सुरू होत नसल्याने प्रवासी नागरिक तसेच बस स्थानक परिसरातील बरेच नागरिक या शौचालयाच्या कडेला उघड्यावरच लघुशंका करीत असून उघड्यावरच शौच करीत असल्याने बिनधास्त पणे स्वच्छ भारत अभियानाला गालबोट लावण्यात येत आहे.या सर्व बाबी गांभीर्याने लक्षात घेता कामठी बस स्थानक परिसरातील सुलभ शौचालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
-कामठी बस स्थानक सुलभ शौचालय सुरळीत चालविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर च्या वतीने कंत्राटी पद्धतीने 24 एप्रिल 2023 पासून 23 एप्रिल 2034 पर्यंत चा 11 वर्षाचा करारनामा सुरेश ढंढोरे जयभोले कन्स्ट्रक्शन अँड मेजनाईज्ड क्लिनिक सेंटर ,श्रीनगर भुसावळ शी करण्यात आले आहे.हे कंत्राट होऊन आज दीड महिना लोटत आहे तरीही शौचालयाच्या शुभरंभाचा मार्ग मोकळा होईना!