– मनसर कान्द्री माईन येथे भीषण अपघात
– अपघातात २ जण गंभीर जखमी
रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर असणाऱ्या कान्द्री माईन रेल्वे क्रॉसिंग जवळ एका भरधाव कार ने पिण्याचे पाणी वाहतूक करणाऱ्या टाटा एस मालवाहक वाहनाला धडक दिल्याने दोन जन गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. ३ जून रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार,कार क्रमांक टी.एन.०९ सी.एच. ९००६ ही भरधाव वेगाने देवलापार कडून मनसरकडे येत होती नेमके याचदरम्यान माईन येथील वार्ड क्रमांक १ मधून पिण्याचे पाणी वाटप करून टाटा एस मालवाहक वाहन क्रमांक एम.एच. ४९ डी २४६९ हा रस्ता क्रॉस करून मनसर मार्गासाठी वळत असतांना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने मालवाहक वाहनाला जोरदार धडक दिली. यात मालवाहक वाहन महामार्गाच्या मध्यभागी पलटले.
घटनेची माहिती खुमारी टोल प्लाझा यांना देण्यात आली.P.R.O लोखंडे यांच्या मार्गदर्शनात अंबुलेन्स टीम डॉ.हनवत,प्रवीण ठाकूर,पेट्रोलिंग टीम दीपक भिमटे,कुंजीलाल तुमडाम यांनी घटनास्थळ गाठले व जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे नेण्यात आले. कारमध्ये असलेल्या महिला नामे संगीतादेवी बापणा वय ३५ वर्ष.रा.तामिळनाडू राज्य व मालवाहक वाहनातील जखमी विनोद रामलाल तायडे वय ४५ वर्ष.सौरभ रामचंद्र डोंगरे वय. २२ वर्ष व उमेश मानकर वय. २६ वर्ष.सर्व राहणार मनसर या कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना नागपूर मेडिकल येथे रेफर करण्यात आले आहे. मालवाहू वाहन रस्त्यात पलटल्याने काही वेळ वाहतूक थांबल्याचे चित्र होते. यानंतर लगेच हायड्रॉ च्या मदतीने वाहन उचलून वाहतूक सुरळीत करण्यात आले.घटनेतील दोन्ही वाहन मनसर पोलीस चौकी येथे जमा करण्यात आले आहे.घटनेचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहेत.