गडचिरोली :- गडचिरोली जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व वसायीक/बिगरव्यावसायीक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सुचीत करण्यात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनाबाबत माहिती, जनजागृती व प्रचार करण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,गडचिरोली येथे दि. 26 मे 2023 रोजी शुक्रवारला सकाळी 11.00 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळेचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर यांच्या हस्ते होणार असून कार्यशाळेला उपायुक्त, जात पडताळणी, संशोधन अधिकारी जात पडताळणी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, गडचिरोली, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गडचिरोली, प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय गडचिरोली व जिल्हयाती समान संधी केंद्र स्थापन झालेले सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व स्वाधार योजनेचे लाभार्थी मुले/मुली उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती पथ कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन अमोल यावलीकर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत एकदिवसीय कार्यशाळा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com