पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात जागोजागी दिसतोय शेळ्या मेंढ्याचा कळप

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यात शेती मशागतीला वेग आला असून खरीप पिकाची लागवड करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर असून शेतकरी वर्ग पीक वाढीसाठी बहुधा रासायनिक खतांचा वापर करण्यात येतो मात्र रासायनिक खतांवर असलेली दरवाढ ही शेतकऱ्याला आर्थिक संकटात अडकवणारी आहे.यासाठी शेतकरी बंधूनी जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी मेंढेपाळ बोलावून शेतात शेळ्या मेंढ्याचा आधार घेण्यात येत आहे त्यामुळे कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात जागोजागी शेळ्या मेंढयाचा कळप दिसून येत आहे. मागच्या दोन वर्षांपूर्वी 3 जून ला हिंगणा रहिवासी एका मेंढेपाळ चा कामठी तालुक्यातील आडका गावातील एका शेतात वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला होता तेव्हा शेतकरी बंधूनी या मेंढेपाळच्या सुरक्षात्मक दृष्टिकोनातुन काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

शेतकरी बंधू पीक वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर अधिक केला जातो मात्र काही शेतकरी शेतात सेंद्रिय खताचा वापर करीत असतात सेंद्रिय खताचा वापर करणाऱ्या शेतकऱ्याचे प्रमाण कमी आहे.शेतात शेळ्या मेंढ्याचा कळप बसविल्याने जमिनीची सुपीकता वाढत असते त्यामुळे शेतकरी शेतात उन्हाळयाच्या दिवसामध्ये शेतात शेळ्या मेंढ्याचे कळप बसवत आहेत.शेतकरी दरवर्षी खरीप रब्बी पीक निघाल्यावर शेत जमिनीची दुरुस्ती करित असतात त्यामुळे जमिनीच्याया वरच्या स्तरात पहिल्या वर्षी सुपीकता कमी असते ती सुपीकता टिकून राहावी यासाठी जमिनीला सेंद्रिय खत चांगले असते असा शेतकऱ्यांचा समज आहे.शेतकरी पूढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतात शेणखत टाकत असतात मात्र बैलबंडी अभावी बरेच शेतकरी शेणखत टाकण्याकडे दुर्लक्ष करतात .शेणखत टाकण्यासाठी मोठ्या प्रमानावर ट्रॅक्टर व साधनांचा वापर करीत असतात.शेतात शेणखत टाकण्यासाठी प्रति ट्रेकटर 800 ते 1000 रुपये भाडे घेत असतात त्यामुळे काही मोजके शेतकरी जमिनीत शेणखत टाकत असतात तर काही शेतकरी रासायनिक खत वापरून पीक घेत असतात .रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची पोत बिघडत चालली असून केवळ एकच पीक शेतजमिनीत चांगले येऊ शकते, दुबार पीक घ्यायचे झाले तर पुन्हा खताचा वापर करावा लागतो मात्र सेंद्रिय खते जमिनीची सुपीकता व पीक निरोगी ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे काम करीत असतात त्यामुळे शेतकरी शेतात शेळ्या मेंढ्याचा कळप बसवतात .मेंढपाळ आपल्या शेळया मेंढ्या घेऊन ग्रामीण भागात डेरेदाखल होत असतात व ते जवळपास चार महिने राहत असतात.शेतात कोणते पीक राहत नसल्याने या कालावधीत शेतात चराईने सुद्धा मेंढपाळ शेतात बसतात त्यामुळे मेंढपाळ दिवसभर चराई झाल्यावर सायंकाळी शेतीमालकाचे शेतात कळप बसवितात ज्या शेतमालकाच्या शेतात चारा नसतो अशा शेतमालकाकडून शेळया मेंढ्या बसविण्याचे पैसे घेतात व शेतमालक शेळ्यांचे कळप पाहून पैसे देतो.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नामांतर, मंडलबाबत शरद पवारांचा युवा पिढीची दिशाभूल करण्याचा डाव - भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा घणाघात

Wed May 24 , 2023
मुंबई :- पुण्यातील एका संघटनेच्या अधिवेशनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आणि मंडल आयोग बाबत केलेली वक्तव्ये युवा पिढीची दिशाभूल करणारी आहेत. या वक्तव्याबाबत शरद पवार यांनी खुलासा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com