नागपूर – महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिन कार्यक्रम २६ जानेवारीला सकाळी ८ वाजता मनपा केंद्रीय कार्यालयातील हिरवळीवर आयोजित करण्यात आला आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.
यावेळीउपमहापौर मनीषा धावडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे उपस्थित राहतील. कोव्हिड नियमांचे अनुसरून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.