– पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्कबाबत विद्याथ्र्यांना मार्गदर्शन
अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅन्ड लिंकेजेसच्यावतीने विद्याथ्र्यांना इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटची माहिती व्हावी या उद्देशाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच वल्र्ड आय.पी.आर. डे चे आयोजन करण्यात आले होते.या माध्यमातून विद्यार्थी संशोधन अथवा इनोव्हेशनची जपवणूक करू शकतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी योगिता पवार यांनी विद्याथ्र्यांना पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क आदींविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून संचालक डॉ. स्वाती शेरेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता अमोल हिरूळकर, नरेश मोहाळे, अंकित ठाकूर, रवी ढेंगळे यांनी परिश्रम घेतले.