भालेराव महाविद्यालयात जागतिक ओझोन दिवस साजरा..

सावनेर : पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन थर संरक्षक कवच म्हणून महत्वाची भूमिका बजावतो. पृथ्वीवरील जीवांचे अतिनिलसंरक्षण करतो. यासाठी जगभरात १६ सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस साजरा केल्या जातो. स्थानिक भालेराव महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचा एक भाग म्हणून आणि ओझोन दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, नॅक चे समन्वयक प्रा. मिलिंद बरबटे यांनी भूषविले. पर्यावरणाची काळजी घेण्याची सवय विद्यार्थीदशेपासूनच सुरु व्हावी आणि यात प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सर्वांनी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रा. डॉ. विलास डोईफोडे, विभागप्रमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आकांक्षा रुशिया, दीक्षिता नागपुरे, श्रुती जामदार, प्राचिका हाकंदे, निशिता कच्छवाह आणि प्रज्वल धांडे या विद्यार्थ्यांनी ओझोन थराचे जिवसृष्टितील महत्व, त्यास असलेला धोका, ओझोन दिन साजरा करण्यामागील इतिहास आणि सामान्य नागरिकांनी याविषयी घ्यावयाची काळजी यावर विस्तृत विचार प्रकट केलेत. याप्रसंगी वृक्षारोपणासाठी रोपवाटप सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण दुलारे, आभारप्रदर्शन प्रा. चंद्रशेखर पोटोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. पराग निमिषे, प्रा. डॉ. प्रदीप आठवले, प्रा. परीक्षित चौधरी आणि विलास सोहागपुरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अनेक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिक्षकाकडून आदिवासी विद्यार्थ्यांला मारहाण प्रकरणात दोन शिक्षकांना अटक.

Sat Sep 17 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी शाळा व्यवस्थापन ने शिक्षकांना केले निलंबित. गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होई पर्यंत दोन शिक्षकांनी काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली. असुन याची तक्रार पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केली, असून पोलिसांनी तेजेश्वर तुरकर व लालचंद पारधी या दोन्ही शिक्षका विरुद्ध भारतीय दंड १८६०, ३२४, ३४ अनुसूचित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com