संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी:- येथील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ विनय चव्हान यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलीत करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय चव्हान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य व सामाजिक विषयक विचारांवर मार्गदर्शन केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे उप्रप्राचार्य डॉ रेणू तिवारी, डॉ मनीष चक्रवर्ती, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ सुधीर अग्रवाल पर्यवेक्षक प्रा व्हीं बी वंजारी,प्रा डॉ जितेंद्र तागडे,डॉ शेंडे,डॉ मुलतानी,प्रा वैशाली मस्के,प्रा किरण पुडके, प्रा रींके व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये वेंकट, संगेवार, यादव, रामटेके उपस्थित होते.