रामदासपेठ पुल तयार करण्याची मागणी

नागपूर :-पश्चिम मतदार संघ येथील श्रीराम भवन जवळील रामदासपेठ पुल गेल्या पावसाळ्यात पडला होता अद्यापही पुलाचे काम झालेले नाही व नागरिकांना ये-जा करण्यास अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. तरी लवकरात लवकर हा पुल तयार करण्यात यावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे मनसे शहर अध्यक्ष चंदू लाडे व विशाल बडगे यांच्या मार्गदर्शनात महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा रचना गजभिये यांच्या नेतृत्वात धरमपेढ झोन मनपा विभागातील सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांना निवेदन देण्यात आले व चर्चा करण्यात आली. निवेदनाचे गांभीर्य ओळखून सहाय्यक आयुक्त यांनी याबाबत लगेच कारवाई करू असे आश्वासन मनसे सेनेच्या शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी महेश जोशी, धनशाम निखाडे, श्याम पुनयानी, उमेश उत्खेडे, अभिषेक माहुरे, अंकित झाडे, स्नेहा खोब्रागडे, कोमल बुरघाटे, अर्चना सोमकुवर, किरण उमरेडकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागर्जुना अभियांत्रिकीमध्ये समाज वैज्ञानिकांची मंदियाळी : भगवान बुद्ध -महात्मा फुले -डॉ.बी.आर.आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन

Sun Apr 9 , 2023
नागपूर :-अमरावती रोडवरील सातनवरी गावाजवळ स्थित मैत्रेय एजूकेशनल सोसायटी द्वारा संचलित नागार्जूना इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट हया महाविदयालयात भगवान बुद्ध, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे. व्याख्यानमालेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष इंजि. मदन माटे व अजय वाघमारे ह्यांच्या हस्ते व संयोजक प्राचार्य डॉ. संजय केलो आणि उपप्राचार्य डॉ.मुरलीधर रहांगडाले यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!