संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी – मौदा विधानसभेच्या वतीने बामसेफ, डी एस फोर व बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बहुजनाचे आदर्श नेते बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांची 89 वी जयंती कामठी येथे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेशचे सचिव नितीन शिंगाडे तसेच नागपूर जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन कामठी विधानसभेचे अध्यक्ष विक्रांत मेश्राम यांनी केले असून आभार प्रदर्शन कामठी शहराचे अध्यक्ष अमित भौसारे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी नगरसेवक विकास रंगारी,माजी नगरसेविका रमा गजभिये ,सुधा रंगारी, विनय ऊके, निशिकांत टेंभेकर, , विशाल गजभिये, राजन मेश्राम, अनिल कुरील, रुपेश बामणे ,श्रीकांत शिंगाडे, चंद्रगुप्त रंगारी , गुरुपाल बोरकर,रामभाऊ कुर्वे,रायभान गजभिये, मनोज रंगारी व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.