पॅरिस ऑलिंपिक मध्ये वैशिष्ट्यपूर्ण खेळ करून यश मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते सत्कार, हॉकी संघाचे समर्पण आणि कष्ट याची मांडवीय यांच्याकडून प्रशंसा

– तुम्ही देशाला अमाप गौरव मिळवून दिला आहे त्याचबरोबर कोट्यवधी युवा खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्फूर्ती दिली.

नवी दिल्ली :- पॅरिस 2024 ओलंपिकमध्ये कांस्यपदक मिळवून विशेष यश संपादन केलेल्या भारतीय हॉकी संघाचा केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथे सत्कार केला. हॉकी संघाची समर्पण वृत्ती व कष्ट यांची प्रशंसा करत संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी त्यांनी जागतिक मंचावर केल्याचं मांडवीय म्हणाले.

संपूर्ण देशाला आपल्या यशाचा अभिमान वाटतो असं मांडवीय यांनी यावेळी सांगितलं हा विजय म्हणजे तुमची चिकाटी, सांघिक वृत्ती आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतिक आहे, असं ते म्हणाले. तुम्ही भारताला अमाप गौरव मिळवून दिला आहे त्याचबरोबर कोट्यावधी तरुण खेळाडूंना त्यांची स्वप्ने पुरी करण्यासाठी स्फूर्ती दिली आहे असंही ते म्हणाले.

#ParisOlympics2024 में कांस्य पदक जीत कर भारत लौटी हॉकी टीम के खिलाड़ियों से भेंट कर उन्हें शुभकामनाएं दीं।#Olympics में 52 साल बाद लगातार दूसरी बार पदक जीत कर आपने देश का नाम रोशन किया है, पूरे देश को आप सभी पर गर्व है।#Cheer4Bharat pic.twitter.com/qcZ38lsWIi

— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 10, 2024

प्रशिक्षक कर्मचारी वर्ग आणि सहाय्यक चमूचे अथक परिश्रम आणि सहकार्य या बाबींचा संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका आहे याचाही केंद्रीय मंत्र्यांनी उल्लेख केला. भारतात हॉकीचा अजून विकास व्हावा आणि देशात क्रीडा नैपुण्य वाढावे म्हणून सर्व आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

हॉकी आमच्यासाठी खेळापेक्षा काही अधिक आहे . हॉकी हे राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. कष्ट, समर्पण वृत्ती आणि जिद्द याचं दर्शन हॉकी संघाने घडवून विजय मिळवला. निश्चय आणि चिकाटी याच्यामुळे काय साध्य होऊ शकते याचं दर्शन तुम्ही जगाला घडवलं असं केंद्रीय मंत्री मांडवीय यांनी अधोरेखित केलं.

खेळाडूंशी संवाद साधताना मांडवीय यांनी त्यांना नैपुण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यासाठी आणि भविष्यात याहून मोठ्या यशाचे लक्ष्य ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केरळमधील वायनाड आणि त्याच्या जवळपासच्या भागात कोणत्याही नैसर्गिक भूकंपाची नोंद नाही

Sat Aug 10 , 2024
नवी दिल्ली :- केरळमध्ये वायनाड आणि त्याच्या जवळच्या भागात 9 ऑगस्ट 2024 रोजी नैसर्गिक भूकंपाची कोणतेही नोंद नसल्याचं राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने म्हटलं आहे. केरळ राज्यात स्थापन केलेल्या भूकंप शास्त्र स्थानकांनी अशा प्रकारची कोणतीही नोंद केली नसल्याचं या केंद्राने म्हटलं आहे. घर्षण उर्जेमुळे भूगर्भात ध्वनी कंपने निर्माण होऊन परिणामी झालेल्या भूस्खलनामुळे अस्थिर झालेले डोंगरांवरील दगड स्थिरता मिळवण्याच्या प्रयत्नात एका स्तरावरून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com