नागपूर :-पाली प्राकृत व बुद्धिस्ट स्टडीज विभाग, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 ते 18 मार्च दरम्यान दुपारी 12 ते 3 च्या वेळेत सहा दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यशाळा अभिधम्मत्थसंगहो व बौद्ध लेणी स्थापत्य ह्या विषयावर आहे.
13 मार्च रोजीच्या उद्घाटकीय सत्राचे अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर हे असून, उद्घाटक पाली विभूषण डॉ. बालचंद्र खांडेकर हे आहेत. तर मुख्य मार्गदर्शक डॉ. श्रीकांत गणवीर पुणे हे आहेत.
यावेळी विभागातील विद्यार्थ्यांच्या वतीने स्वतः जवळील ऐतिहासिक व दुर्मिळ पुस्तकांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. श्रीकांत गणवीर, डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ) पुणे हे 13 ते 16 मार्च दरम्यान बौद्ध लेणी स्थापत्य या विषयावर मार्गदर्शन करतील. तर डॉ. तलत प्रवीण, पाली व बुद्धिस्ट स्टडीज विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ह्या 16 पासून 18 मार्च पर्यंत मार्गदर्शन करतील.
समारोपीय सत्राचे अतिथी डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, रा तु म नागपूर विद्यापीठ, नागपूर हे राहतील.
कार्यशाळेला आजी-माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. नीरज बोधी व विद्यार्थ्यांच्या वतीने उत्तम शेवडे ह्यांनी केले आहे.