संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- क्रीडा युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत क्रीडा समिती द्वारा आयोजित एस के पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रेम बागडे हा U-19 वयोगटामध्ये कॅरम स्पर्धेच्या तीन राऊंड पैकी दोन राऊंडमध्ये त्याने विजय प्राप्त केला आणि प्रत्युश सचंदेवे याने U-17 वयोगट मध्ये कॅरम च्या दोन राऊंड मध्ये विजय प्राप्त केला असून या दोनही विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरावर निवड झाली आहे. हि स्पर्धा 25 ते 26 या कालावधी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे पार पडणार आहे
स्पर्धेसाठी पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षिका प्रा. मल्लिका नागपुरे यांनी विशेष मोलाचे मार्गदर्शन केले आणि पुढील स्पर्धेकरिता मनस्वी शुभेच्छा दिल्या.
प्रेम बागडे व प्रत्युश सचंदेवे यांची विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक प्रा. वंजारी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदानी त्याचे अभिनंदन केले व पुढील गोंदिया येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.