संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-पोस्ट मास्टर जनरल नागपुर ऑफिस तर्फे सुकन्या समृद्धि योजना आणि अटल पेंशन योजनाचे शिबिर गौतम नगर जूनी छावनी कामठी येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
कामठी हेड पोस्ट ऑफिस चे डेप्यूप्टी पोस्ट मास्टर मंगेश घोडवैद्य यांनी उपस्थित नागरिकांना सुकन्या समृद्धि योजना, अटल पेंशन योजना बाबत माहिती दिली केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी दिली.
यावेळी भाजपा पदाधिकारी संजय कनोजिया,उज्वल रायबोले,प्रतिक पडोळे,विक्की बोंबले आणि सुबोध चांदोरकर, कुणाल झोडापे,धर्मपाल नागदेवे,रोहन देशभ्रतार, नितेश वानखेड़े,नवीन खोब्रागडे,शैलेश डांगे,सुशील पौनिकर, राकेश दहाट,नंदेश्वर डांगे,बादल कठाने,नेहा शहारे,रोशनी कानफाडे, सरोज बागड़े, प्रिया डांगे, माधुरी गजबे, पोस्टमैन हरेश्वर नवले, हरीश टिकार, धनंजय इंगोले, सचिन देशमुख,रामकृष्ण डाखोरे आदी उपस्थित होते