अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ;विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी…

मुंबई : – शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत…अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे… जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा सहावा दिवस असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडी आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'Jan Aushadi Diwas - 2023' celebrated in Mumbai

Thu Mar 9 , 2023
“Maharashtra Governor calls for implementing the Jan Aushadhi Yojana in a mission mode” Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais has called for implementing the Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana in the small cities and villages of Maharashtra in a mission mode so that maximum people of the State are benefited by the affordable medicines provided through Jan Aushadhi Kendras. The […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!