संदीप बलविर, प्रतिनिधी
जीवाची पर्वा न करता केली कोरोना रुग्णाची सेवा
ग्रा प टाकळघाट कडून कोरोना योद्धांचा सत्कार
नागपूर :- जगात कुणी विचार सुद्धा केला नसेल की आपल्या सुखा दुःखात सहभागी होण्याचे दावे करणारे मनात असतांना देखील नाईलाजाने परक्या सारखे वागायला लागतील.परंतु नियतीने कळ फेरला,कोरोना नामक महामारीने संपुर्ण जगाच्या संस्कृतीला पालथं घातलं.रक्ताची नाती दूर झाली.या संसर्गासमोर संपुर्ण यंत्रणेने आपले गुडघे टेकले आणि अख्या जगावर राज्य करणारा मानवी देह एकटा पडला परंतु याच काळात काही मानवी रूपातले देवदूत पुढे आले आणि एकट्या पडलेल्या या मानवाला आधार वाटू लागले.त्यातलेच काही खरे देवदूत म्हणजेच कोरोना योद्धे ज्यांनी स्वताच्या जीवाची आणि परिवाराची चिंता न करता कोरोना बाधित रुग्णांच्या मनात जगण्याची उमेद निर्माण केली.त्यामुळे हे योद्धे आत्मीयतेतून सत्कारास पात्र असल्याचे मत स्थानिक ग्रा प सरपंच शारदा शिंगारे यांनी दि ०४ फेब्रु ला शिंगारे सभागृह येथे आयोजित कोरोना योद्धा सत्कार समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
कोरोना काळात अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेकरिता झटणारे वैदयकीय अधिकारी,परिचारिका,वाहनचालक,ग्रा वी अधिकारी, तलाठी,ग्रा प कर्मचारी,सफाई कामगार,अंगनवाडी सेविका, आशा कर्मचारी व पत्रकार ज्यांनी कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता कोविड योद्यांच कार्य केल त्यांच्या उत्साहात भर घालण्याकरिता सरपंच शारदा शिंगारे यांनी या कोविड योद्यांचा सत्कार समारंभ घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. यांच्यासह या कार्यक्रमात कोविड योद्धे म्हणून काम करणारे प्रा आ केंद्राचे वैदयकीय अधिकारी देवशीष झा, लॅब तंत्रज्ञ नरेश तकसांडे, पत्रकार जितेंद्र वाटकर, रघुवीर पालीवाल,अमोल माथुरकर,चंदू कावळे,संदीप बलविर,गणेश सोनटक्के,देविदास मानकर,सागर दुधपचारे,नयन डफरे,अंगणवाडी सेविका निर्मला टोनपे,प्रांजली मालोडे,अर्चना साखरकर, सुरेखा मगर, व अनेक कोरोना योद्धाचा पुष्पगुच्छ,शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ग्रा प सरपंच शारदा शिंगारे,तर प्रमुख अतिथी म्हणून हिंगणा पंचायत समिती सभापती सुषमा कडू,उपसरपंच नरेश नरड,ग्रा प सदस्य राजश्री पुंड,वर्षा डायरे,बबिता बहादूरे,सतीश कोल्हे,सुधा लोखंडे,वनिता चटप, रंजना झाडे, सुनंदा ठाकरे, सुनीता खोडे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चटप, मनोहर खोडे व ताराचंद बहादूरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयन डफरे, प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी देशमुख तर आभार आकाश खेडकर यांनी केले.कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते.