मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई

नागपूर,ता. २९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (२९ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४२५८७ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९६,५२,५००/- चा दंड वसूल केला आहे.

          शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक बाजारपेठेत फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

          बुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे हनुमाननगर झोन अंतर्गत २, गांधीबाग झोन अंतर्गत ४,  सतरंजीपूरा झोन अंतर्गत १, आशीनगर झोन अंतर्गत २ आणि मंगलवारी झोन अंतर्गत ८ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंत ३७११७ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ८५ लक्ष ५८ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

इंटर-सिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल कॅम्पेन' १ जानेवारीपासून

Wed Dec 29 , 2021
नागपूर. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर महानगरपालिकातर्फे नागरिकांना सायकलिंग अँड वॉकिंग करिता प्रोत्साहन देण्यासाठी ‘इंटर-सिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल कॅम्पेन’ (intercity freedom to walk and cycle campaign) १ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!