नागपूर : स्टेशन रोड, सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्य कार्यालयात मंगळवार, दिनांक २६ जानेवारी रोजी ७४वा प्रजसत्ताक दिन साजरा करण्यात आला. ‘नासुप्र’चे सभापती तथा ‘नामप्रविप्रा’चे आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी (भाप्रसे) यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. सभापती यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमात ‘नामप्राविप्र’चे अपर महानगर आयुक्त अविनाश कातडे, नासुप्रचे महाव्यवस्थापक निशिकांत सुके, ‘नामप्राविप्र’मध्ये नगर रचना विभागाचे सह संचालक आर. डी. लांढे, ‘नासुप्र’चे अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, ‘नामप्रविप्रा’चे अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी अनिल कुमार पातोडे, कार्यकारी अभियंता (उत्तर) पोहेकर, कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी आणि आस्थापना अधिकारी विजय पाटील तसेच नासुप्र आणि नामप्रविप्रा अन्य अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर सुधार प्रन्यास येथे ७४वा प्रजसत्ताक दिन साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com