भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त कामठी तालुक्यातील विविध शासकीय ,निमशासकीय कार्यालयासह ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.त्यानुसार नविन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी दुय्यम पोलीस निरीक्षक, एपीआय भातकुले,एपीआय नरवाडे,पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे,पोलीस उपनिरीक्षक पवार,पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर यासह पोलीस स्टेशनचे समस्त अधीकारी कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते तर जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी एपीआय जितेंद्र ठाकूर ,पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने यासह पोलीस स्टेशनचे समस्त अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.वाहतूक पोलीस विभाग कामठी येथे वाहतूक पोलीस निरीक्षक गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी समस्त वाहतूक पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कामठी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी कृष्ठरोग व नशामुक्तीचा संकल्प करीत सामूहिक शपथ सुद्धा घेण्यात आली.याप्रसंगी सभापती दिशा चनकापुरे,उपसभापती दिलीप वंजारी यासह पंचायत समिती सदस्यगण व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कामठी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी कार्यालयीन समस्त अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षिका नैना धुमाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी महिला पोलीस अधिकारी व सहकारी पथकच्या वतीने तिरंगी झेंड्याला सलामी देण्यात आली.याप्रसंगी नायब तहसीलदार,कार्यालयीन अधिकारी कर्मचारी सह लोकप्रतिनिधी व गनमान्य नागरिक उपस्थित होते.तसेच कामठी बस स्टँड चौकात कामठी वृत्तपत्र विक्रेता च्या वतीने डॉ शेंदरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी माजी सरपंच इंदलसिंग यादव कृष्णा पटेल, हुसेन अली तय्यब अली,शुभान ,नसीम , सलीम ,राजेश काटरपवार, गजेश यादव, विजय जैस्वाल, कोमल लेंढारे आदी उपस्थित होते.तसेच कामठी रेल्वे स्टेशन मार्गावर स्व.सरजूप्रसाद दुबे जन कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने माजी नगरसेविका सुषमा सीलाम तसेच ज्येष्ठ समाजसेवक सुनील चहांदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी संस्था संचालक नितु दुबे, प्राजक्ता वासनिक, कांचन संतांनी, गीता विश्वकर्मा,नरेश फुलझेले,आशिष मेश्राम, राकेश पांडे ,सुमित गेडाम,कोमल लेंढारे,आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सातगाव ग्रामपंचायत झाली आयएसओ

Fri Jan 27 , 2023
संदीप बलविर, प्रतिनिधी नागपूर :- बुटीबोरी जवळील सातगाव ग्रामपंचायतला आय एस ओ दर्जाचे नामांकन प्राप्त झाले आहे.गुरुवार दि २६ जाणे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आय एस ओ प्रमाणपत्र ग्रामपंचायत सरपंच योगेश सातपुते यांना प्रदान केले. शासकीय काम म्हटले की,दप्तरदिरंगाई असे समीकरणच बनले आहे.मात्र सातगाव ग्रामपंचायतने जलद व योग्य प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी फलक लावून प्रत्येक बाबीची माहिती दिल्याने नागरिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com