ग्रामीण स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ओ .डी .एफ.टप्पा 2  केली तपासणी

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

तपासणी चमूने केली नवेझरी गावाची पाहणी

गोंदिया :- जिल्हातील तिरोडा तालुक्यातील ग्रांममंडळ नवेझरी येथे 26 सप्टेबर ला ओ.डी.एफ.टप्पा०२ तपासणी चमु आली. ग्रांममंडळ मधे अगोदर आचार्य विनोबा भावे यांच्या फोटो चे पुजन व माल्यार्पण खंडविकास अधिकारी राहागडाले  यांनी केले. त्या नंतर पाहुण्यांचा स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविक ग्रांममंडळ अध्यक्ष महेन्द्र भांडारकर यांनी सांगितले की पुरस्कार केवळ दिखावा नाही तर २००४ पासून ते २०२१-२२ पर्यंत सतत श्रमदान विचार परीवर्तन करण्याचे काम करीत आले तेव्हा कुठे आज गाव ओडीफ प्लस झाले. तसेच संतगाडगेबाबा पुरस्कार असो किंवा स्मार्ट सुंदर गाव ह्या संर्पूण प्रतियोगिता मधे गावाने भाग घेतला.

सतत श्रमदानातून गाव विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत असे प्रास्ताविक मध्ये सांगितले. तर कार्यक्रम अध्यक्ष खंडविकास अधिकारी राहागडाले  यांनी आपल्या मार्गदर्शन मधे सातत्याने हे टीकवून ठेवणे आवश्यक आहे. तर रोजगार निर्मिती गावात कशी होईल पाणी पुर्णभरण ज्या मूळे भविष्यात येणारी पाणी समस्या निकाली लागून पाण्याचा जलस्रोत वाढ होईल व जी कामे केली ती टीकवून ठेवले पाहिजे.

असे अध्यक्षशिय भाषणातून मार्गदर्शन केले. व नतर गावात शाळा आंगणवाडी मोक्षधाम सार्वजनिक शौचालय सार्वजनिक शौषखडे हेन्डंपंप गावात आवश्यक ठिकाणी चमू ने पाहानि केली. त्यावेळी सि.डी पि.ओ.मानकर, विस्तार अधिकारी कुटे , आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी बडोले , विस्तार अधिकारी, एस.बि एम चे पटले तसेच ग्रांममंडळ अध्यक्ष महेंद्र भांडारकर उपाध्यक्ष प्रभूदास ऊके, पोलीस पाटील प्रकाश भांडारकर, ग्रांममंडळ सचिव एम. बि.मेश्राम, ग्रांममंडळ सदस्य राजु नांदगावे, प्रमोद मंदुरकर, प्रमोद मानकर, प्रभुदास मेश्राम, नंदकुमार सुरसाऊत. देवदास ईनवातेे, निर्मला ऊके, सविता ऊके सदस्या, हरीराम जी शेन्डे, गोपाळ शेन्डे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नरेश सहारे ऊपस्थित होते सुत्र संचालक चद्रंशेखर ऊके यांनी केले आभार अजय भांडारकर सदस्य यांनी केले

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com