नागपूर : नागपूर शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती नव्या पिढीला व्हावी, शहरातील समृद्ध वारस्याचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने नागपूर@२०२५ च्या वतीने ‘हेरिटेज वॉक’ चे रविवारी (ता.२२) आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त गजेंद्र महल्ले, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, सतरंजीपूरा झोनचे सहाय्यक आयुक्त घनश्याम पंधरे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, नागपुर@2025 चे शिवकुमार राव, संयोजक निमिष सुतारिया, सीईओ मल्हार देशपांडे, झोनल स्वच्छता अधिकारी सुरेश खरे आदींची उपस्थिती होती.डीडी नगर विद्यालय म्हणजे पुर्वीचा बकाबाईचा वाडा येथू हेरिटेज वॉकला सुरूवात झाली व पाताळेश्वर द्वार, हनुमान खिडकी, सीनिअर भोसला पॅलेस या मार्गे रुक्मिणी मंदिरात समापन झाले. हेरिटेज वॉकमध्ये युवा इतिहासकार अथर्व शिवणकर यांनी वॉकचे नेतृत्व केले. शुभम चोपकर यांच्या नेतृत्वात कलावंतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रिद्धी विकामसी यांच्या नेतृत्वातील चमूने शास्त्रीय संगीताचे सादरीकरण केले. अर्बन स्केचर्सच्या चमूने ऐतिहासिक स्थळांचे लाईव्ह स्केचिंग केले.हेरिटेज वॉकला शहरातील तरुण आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. यामध्ये सर्व वयोगटातील २५० पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग होता. अथर्व शिवणकर यांनी इतिहासाचा अभ्यास आणि कथनाच्या अप्रतिम शैलीद्वारे सहभागींना स्तब्ध केले. या प्रसंगी गणेश राठोड, सुरेश खरे यांच्या सत्कार करण्यात आला.
नागपुर@2025 चे सीईओ मल्हार देशपांडे यांनी नागपूर@2025 चे व्हिजन, हेरिटेज वॉक सारख्या पुढाकारांची संकल्पना मांडली.