मोक्षधाम चौक ते एस. टी. स्टँड चौक वाहतूक बंद 

मनपा आयुक्तांचे आदेश : ३० मार्च २०२३ पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट कॉक्रीट रोडचे काम सुरू असल्याने, मोक्षधाम चौक ते एस.टी. स्टँड रस्त्यापर्यंत बांधण्यात येणारे सिमेंट काँक्रीट रस्त्यामधील मोक्षधाम चौक ते एस. टी. स्टँड चौकापर्यंत Ch. 10 ते Ch 708 दोन्ही बाजू दरम्यान रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. प्रस्तृत कामाकरीता या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करणे आवश्यक आहे.

मोक्षधाम चौक ते एस. टी. स्टँड रस्त्यापर्यंत बांधण्यात येणारे सिमेंट काँक्रीट रस्त्यामधील डालडा कंपनी चौक ते एस. टी. स्टँड चौकापर्यंत Ch. 270 ते Ch 700 दोन्ही बाजू दरम्यान रस्ता कोणत्याही वाहतूकीस बंद करण्याचे आदेशीत करीत आहे. नमुद रस्त्यावरील वाहतूक डालडा कंपनी चौक ते इमामवाडा चौक ते बैद्यनाथ चौक ते एस.टी. स्टँड मार्गाने दुतर्फा जाईल / इतर वाहतूक रस्त्यावरुन वळवण्यात येत आहे. सदर आदेश दिनांक २० जानेवारी २०२३ पासून दिनांक ३० मार्च २०१३ पर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमूद केले आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेले आदेशात या रस्त्यादरम्यान दोन्ही बाजूस ठळक अशा ठिकाणी नागरिकांच्या सुचनेकरिता फलक लावणे, सदर रस्ता वाहतूक बंद करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी कांबी किंवा खांब व इतर संपर्क साधने वापरून रस्त्यावरील वाहतूक बंद करणे, आवश्यक वळण मार्ग दर्शविणारे फलक योग्य त्या ठिकाणी उभारणे, या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता अशी व्यवहार्य सुविधा उपलब्ध करणे तसेच विहित कालमर्यादेत काम पूर्ण करून रस्ता वाहतूकीस खुला होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आदेशात नमूद केले आहे की, रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजुचे दुतर्फा व हतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतुक नियमांचे तसेच वाहतुक पोलीसंनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी. असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाळासाहेब ठाकरे प्राणिसंग्रहालयात एका बिबटचा मृत्यू

Tue Jan 17 , 2023
नागपूर :- गेल्या आठवड्यात प्राणिसंग्रहालयातील एक मादी बिबट (चांदणी) सफारी पिंजऱ्यामधून रात्र निवाऱ्यात न परतल्याने गेले ३ दिवस या मादीचा शोध घेण्याचे काम चालू होते. रविवारी संध्याकाळी या बिबटला पकडण्याकरिता पिंजऱ्यामध्ये बिबट पकडण्याचा पिंजरा लावण्यात आला होता. सोमवारी पहाटे या पिंजऱ्यात एक नर बिबट पकडला गेला. हा नर बिबट गोरेवाडा जंगलातून या सफारी पिंजऱ्यात शिरल्याचे लक्षात आल्याने सोमवारी चांदणीला शोधण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com