मुंबई :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते (दि. १२) विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय योगदान पुरस्कार २०२३’ राजभवन येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन धम्मदान ट्रस्ट व ‘परफेक्ट वूमन’ मासिकातर्फे करण्यात आले होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण व कुमार शानू , अभिनेते रणवीर शोरे, पर्यावरण परिषदेचे विजयराजे धमाल, दिपशिखा देशमुख, रीना त्रिवेदी, डॉ ख़ुशी गुरुभाई, कैलास मासूम, सीताराम गायकवाड, मोहम्मद सईद शेख व राखी राजाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे निमंत्रक गुरुभाई सुरेशभाई ठक्कर, वास्तू तज्ज्ञ बसंत रसिवासिया, डॉ गीत ठक्कर व चंद्रमणी जाधव यावेळी उपस्थित होते.